क्राईमपुणे जिल्हा ग्रामीणपुणे शहर

कांदा विकला शेतकऱ्याने , 18 लाख रुपये उडवले टेम्पो ड्रायव्हरने , दौंड तालुक्यातील धक्कादायक प्रकार……

सातारा (टीम – बातमीपत्र)
कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांदाच्या विक्रीतून मिळालेली १८ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरी करणाऱ्या तीन युवकांना २४ तासाच्या आत अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले असुन त्यांच्याकडून चोरी केलेली १७ लाख ९९ हजार ४० रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी बेळगाव येथे कांद्याची विक्री करून टेम्पोमधून प्रवास करीत गावी जात असताना ( दि. ३) रोजी पहाटेच्या सुमारास वाढे (ता. जि. सातारा) येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी काही जण चहा पिण्यासाठी गाडीतून उतरले होते, तर काही जण गाडीत झोपलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने टेम्पोमधून पैसे ठेवलेली बॅग चोरुन नेली होती. या चोरी झालेल्या बॅगेमध्ये १८ लाख ६० हजार रुपये होते. रक्कम ठेवलेली बॅग चोरी झाल्याची माहिती या शेतकऱ्यांना साताऱ्याहून लोणंद मार्गे पुण्याकडे प्रवास करत असताना समजले. त्यानंतर त्यांनी पुन्हा सातारला येऊन सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन चोरी झाल्याची माहिती देत गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेबाबत पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या सूचनेनुसार सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनेची माहिती घेऊन टेम्पोचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना विसंगत उत्तरे दिल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. त्याच्याकडे अधिक विचारपूस केल्यानंतर त्याने अन्य दोन साथीदारांना वाढे फाटा येथे बोलावून घेवून त्यांच्याकडे रोख रक्कम असलेली बॅग चोरी करून दिल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे इतर दोन युवकांची माहिती गोळा करून त्यांच्या शोधार्थ एक पथक दौंड तालुक्यात जावून त्यांनी ठिकठिकाणी छापे टाकून गुन्ह्यातील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता चोरी केल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश मच्छिंद्र ताकवणे (वय २८, रा. पारगाव, ता. दौड, जि. पुणे), अजय भारत भोले (वय २५, रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे), अन्सार उरमान शेख (वय २१, रा. नानगाव, ता. दौंड, जि. पुणे) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांनी चोरी केलेल्या रकमेपैकी १७ लाख ९९ हजार ४० रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त केली आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!