विशेष बातमी

दौंडला स्वतंत्र प्रांत कार्यालय हे आमदार राहुल कुल यांच्यामुळेच सुरु – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आमदार राहुल कुल हे नेहमीच प्रयत्नशील असतात. राज्यातील बोटावर मोजता येणाऱ्या तालुक्यात स्वतंत्र प्रांत कार्यालय असून त्यामध्ये दौंड चा समावेश झाला ही आनंदाची बाब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांना 70 हजार मतांनी निवडून द्या तुम्ही माघाल ते देऊ अशा प्रकारचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
दौंड तालुक्याच्या स्वतंत्र प्रांत कार्यालयाच्या उद्घाटन महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजीत शेतकरी मेळाव्यात दौंड येथे ते बोलत होते.
याप्रसंगी माढ्याचे खासदार रणजितसिह निंबाळकर, माण-खटाव चे आमदार जयकुमार गोरे,दौंड चे आमदार राहुल कुल,नगराध्यक्षा शितल कटारिया, प्रदीप कंद,बाळासाहेब गावडे, आदेश मोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे,दिलीप काळभोर, दादा पाटील फराटे,प्रेमसुख कटारिया, नंदू पवार, नामदेव बारवकर, हरिभाऊ ठोंबरे,गणेश जगदाळे, शरद कोळपे आदी सह दौंड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विखे पाटील म्हणाले की, मागील सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात सामाजिक, राजकीय व वैचारिक पातळी ढासळली असून राज्याला दळभद्री सरकार मिळाले होते. राज्यावर कोविड सारखी भयानक परिस्थिती असताना तत्कालीन मुख्यमंत्री जनतेला दिसले नाहीत. सध्याचे राज्यातील शिंदे -फडणवीस- पवार सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!