राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचा भाजपमध्ये प्रवेश…….
केडगाव (टीम – बातमीपत्र)
दापोडी ( ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आबासाहेब तुकाराम गुळमे यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे,आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये
जाहीर प्रवेश केला आहे.
काल दि.१० रोजी दौंड शहरातील मेळाव्यात हा प्रवेश करण्यात आला.
दापोडी ( ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक
डिसेंबर २०२२ मध्ये झाली होती . या निवडणूकीत थेट जनतेतून सरपंच निवड होती. यामध्ये सरपंच आबासाहेब तुकाराम गुळमे हे विजयी झाले होते. सरपंच गुळमे हे माजी आमदार रमेश थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मात्र त्यांनी आत्ता आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने माजी आमदार रमेश थोरात यांना हा धक्का मानला जात आहे.
यावेळी बोलताना सरपंच गुळमे म्हणाले की , आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असणाऱ्या विकासकामांमुळे प्रभावित होउन भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वात दापोडी गावात व तालुक्यात काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.