दौंडमधील विवाहितेच्या मृत्यु प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक…..
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड शहरातील विवाहितेच्यामृत्यु प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित रवींद्र ओहळ यास काल दि.26 डिसेंबर रोजी पाटस (ता. दौंड) जि. पुणे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असल्याची माहिती दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटिल यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्वेता रोहित ओव्हाळ (वय-२३, रा. रेल्वे हायस्कूल रस्ता, बंगला साइड, दौंड) हि विवाहित बुधवारी (दि.२०) रोजी रात्री गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. श्वेता हिला उपचारांसाठी एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॅाक्टरांनी ती उपचारापूर्वीच मयत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान , (दि.२१) रोजी दुपारी श्वेता हिच्या माहेरच्या लोकांनी श्वेता हिची सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा दावा करीत दौंड पोलिस ठाण्यात मृतदेहासह ठाण मांडले. श्वेता हिचा मृतदेह पोलिस ठाण्यातील ध्वजस्तंभाजवळ ठेवून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.
त्यानंतर दौंड पोलिसांनी पती रोहित रविंद्र ओव्हाळ , दीर रोहन रविंद्र ओव्हाळ , नणंद रितू रविंद्र ओव्हाळ , सासु रमा रविंद्र ओव्हाळ , अत्त्ते सासु राणी वसंत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित रवींद्र ओहळ यास काल दि.26 डिसेंबर रोजी पाटस (ता. दौंड) जि. पुणे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.