केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील आज दौंड दौऱ्यावर…..
दौंड (टीम बातमीपत्र) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील आज दौंड येथील रेल्वे स्थानकाला भेट देणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री. हरिभाऊ ठोंबरे यांनी दिली आहे
याबाबत अधिक माहिती अशी कि, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री. रावसाहेबजी दानवे पाटील हे आज रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता दौंड रेल्वे स्थानकास भेट देणार असून, दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी केलेल्या विनंती नुसार रेल्वेच्या विविध समस्यांसंदर्भात बैठक घेणार आहेत. यावेळी पुणे व सोलपुर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व रेल्वे प्रवासी संघटना, रेल्वे प्रवासी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे