खडकी विकास सोसायटीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला धक्का , ३ संचालक फुटले ..
राजेगाव ( टीम – बातमीपत्र)
खडकी (ता.दौंड) येथील खडकी विविध सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रविंद्र भानुदास काळे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम काळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सहकार भवन , दौंड येथे निवड प्रक्रिया घेण्यात आली.
संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. संस्थेत ८ संचालक राष्ट्रवादी विचाराचे तर ४ संचालक भाजपाचे होते. अंतर्गत राजकारणाला कंटाळून काळे यांच्यासह राष्ट्रवादीचे ३ संचालक भाजपला जाऊन मिळाल्याने संस्थेत भाजपाचे बहुमत झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय काळभोर ,भीमा पाटसचे संचालक महेश शितोळे, संस्थेचे उपाध्यक्ष गणेश शिंदे, संचालक माणिक काळे, मच्छिंद्र काळभोर, धोंडिबा काळे, बाळासाहेब गुणवरे, किरण काळे, दत्तात्रय शितोळे, मोहन काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. सी. शितोळे यांनी काम पाहिले.