वरवंड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन – आमदार राहुल कुल
वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटस, ता. दौंड येथे स्थानांतरीत करणार
दौंड (टीम बातमीपत्र) वरवंड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास राज्य शासनाची मान्यता मिळाली असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे.
यावेळी आमदार अॅड. कुल म्हणाले की, विधानसभा सभागृहात दि. २५ जून २०१९ रोजी मौजे वरवंड येथील ग्रामीण रुग्णालय स्थापन करणेबाबत अर्धातास चर्चा उपस्थित केली होती सदर चर्चेवेळी उत्तर देताना तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री यांनी “विशेषबाब” म्हणून ग्रामीण रुग्णालय स्थापनेस मान्यता देण्याचे आश्वासन यावेळी दिले होते.
सदर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मौजे वरवंड (ता. दौंड, जि. पुणे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. लवकरच हे रुग्णालय प्रत्यक्षात सुरू होऊन नागरिकांना देखील याचा लाभ होणार आहे. या रुग्णालयासाठी नवीन सुसज्ज इमारतीसाठी देखील पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी सांगितले आहे.
याकामी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे दौंड तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार अॅड. राहुल कुल यांनी आभार मानले आहेत.
वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पाटस येथे सुरु करणार
तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी आमदार अड. राहुलकुल प्रत्नशील असून, दौंड येथील उपजिल्हा रुग्नालायाचे १०० खाटामध्ये श्रेणीवर्धन केलेअसून सुमारे ३६ कोटी रुपयांच्या सुसज्ज इमारतीचे काम सुरु आहे. वरवंड येथे ग्रामीण रुग्णालय सुरु झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सध्या सुरु असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र पाटस, ता. दौंड येथे स्थानांतरीत करून त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्राचे जागी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करणार असल्याची माहिती आमदार अॅड. राहुल कुल यांनी यावेळी दिली आहे.