सत्तरीत भारी, सायकल वारी
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड शहरातील विजय ज्ञानदेव जगदाळे (वय ७० वर्षे) यांनी तरुणांना लाजवेल असा सायकलवरुन दौंड ते पंढरपूर असा प्रवास केला आहे. वयाच्या सत्तरीतही तोच जोश व तोच होश या विजय जगदाळे यांच्यामध्ये पहायला मिळत आहे.
शिवजयंती निमित्त विजय जगदाळे यांनी सहकारी सुरेश बनाजी मराडे
(वय 53) यांच्यासह शिवजयंती दिवशीच दौंड ते पंढरपूर असा सुमारे 150 किलोमीटर प्रवास सायकलने पूर्ण केला आहे. त्यांच्या या सुखरूप प्रवासामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
विजय जगदाळे यांना लहानपणापासून व्यायाम , योगा आणि सायकल चालवण्याची आवड आहे.आजही या वयात दररोज ५ किलोमिटर पायी चालणे,योगा करणे व सायकलिंग करणे हे ते न चुकता करत असतात.
आगामी काही दिवसांतच दौंड ते
शिवनेरी व रायगड येथे सायकल वरून प्रवास करण्याचा त्यांचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.