जागतिक महिला दिनानिमित्ताने दौंड मधील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान….. रूपदा ब्युटी अँड ॲकॅडमी चा पुढाकार
दौंड(टीम – बातमीपत्र)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधित, परीज इंटरनॅशनल ब्युटी इन्स्टिट्यूट अंतर्गत रूपदा ब्युटी अँड अकॅडमीच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिला दिनानिमित्ताने अकॅडमी आयोजित सरकार मान्यता मोफत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा(79)ही प्रशस्तीपत्रक देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी परीज इन्स्टिट्यूटच्या सोनाली यादव, डॉ.सुषमा भोर ,डॉ. ज्योती पानसरे ,दीप्ती खैरे, प्रियंका देशमुख- जगदाळे,पो. पाटील नीता वाघमारे, वैशाली शितोळे ,योगिता जाधव तसेच आई सेवा संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजक तथा मेकअप अँड टॅटू आर्टिस्ट मनीषा बोरा मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, महिला व मुलींनी ब्युटी पार्लर क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीने पहावे, या क्षेत्रामध्ये लहान लहान कोर्सेस आहेत, ते पूर्ण केल्याने तुम्ही आत्मनिर्भर उद्योजक कसे बनवू शकता याविषयी बोरा यांनी मोलाची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी ही आपल्या भाषणातून महिलांना प्रोत्साहन दिले.