तलवार दाखवत दहशत करणाऱ्यास अटक , दौंड पोलिसांची कारवाई….
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड शहरात हातात तलवार बाळगून दहशत माजवणाऱ्या एकास दौंड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने अटक केली असल्याची माहिती पोलिस निरिक्षक संतोष डोके यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,
दि. 26 मार्च रोजी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , दौंड शहरातील नगरमोरी चौक येथे तुषार दत्तात्रय जावरे (रा. सिद्धार्थनगर , दौंड) हा आपले ताब्यात धारदार तलवार बाळगून दौंड शहरात व परिसरात दहशत निर्माण करत आहे.ही बातमी मिळताच पोलिस निरीक्षक डोके यांनी दौंड पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकला सूचना देत त्या ठिकाणी पाठवून तुषार दत्तात्रय जावरे (वय 20 रा. सिद्धार्थनगर, दौंड ) याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे धारदार तलवार मिळून आली .
त्यास दौंड पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) प्रमाणे गुन्हा नोंद केला. असून पुढील तपास पोलिस नाईक अमीर शेख हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती संजय जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुभाष राऊत,पांडुरंग थोरात , नितीन बोरडे विशाल जावळे,आदेश राऊत,अमोल देवकाते यांनी केली.