जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्याना मिळाले औद्योगीक ज्ञान ……
दौंड (टीम – बातमीपत्र)
ओम इंडस्ट्रीज मेरगळवाडी(ता. दौंड) येथे दि.27 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेरगळवाडी व माळेवाडीतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना औद्योगिक ज्ञान मिळावे यासाठी गोपाळवाडीचे केंद्रप्रमुख संदीप होले यांच्या पुढाकारातून या भेटीचे आयोजन ओम इंडस्ट्रीजचे मालक बापू नवले यांनी केले होते.
याठिकाणी विविध प्रकारच्या स्वयंचलित मशीन पाहून विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली.त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अक्षय नवले यांनी दिली. ओम इंडस्ट्रीजचे मालक बापुसाहेब नवले यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. यावेळी उद्योजक बापू नवले यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाची व यशोगाथेची माहिती संजय गावडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. एक आगळावेगळा उपक्रम राबविल्या बद्दल दोन्ही शाळांच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी शाळेतील शिक्षक व उद्योजक बापू नवले यांचे कौतुक केले.