कंपनीत वायुगळती, एकाचा मृत्यु तर दोन जखमी……
दौंड (टीम बातमीपत्र)
भांडगाव(ता.दौंड) येथील वेस्टर्न मेटल कंपनीत वायू गळती होऊन एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
भांडगाव (ता.दौंड) येथील खोर रोड लगत असणाऱ्या या कंपनीत गुरुवारी (दि.28 )रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही वायू गळती झाली असल्याची माहिती मिळत असुन पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित कंपनी मधील गोडावूनमध्ये वायू गळती होऊन ही घटना घडली असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे .
यामध्ये खोर (ता. दौंड) येथील अमोल सुरेश चौधरी (वय 24 ) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर भगवान पुजारा ( रा. यवत ता. दौंड) आणि पंकज जाधव( रा. भरतगाव,ता. दौंड) यांच्या वर लोणी काळभोर मधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत .
दरम्यान , घटनास्थळी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.