राजकीयविशेष बातमी

निवडणुकांमुळे युट्यूबर्स आणि प्रभावी लेखकांची चलती ……

दौंड (प्रतिनिधी)
निवडणूक म्हणजे एक युद्धच असते. हे युद्ध जितके मैदानावर खेळले जाते, तितकेच ते कागदावरही खेळले जाते. आता त्यामध्ये आणखी एक परिमाण महत्त्वाचे ठरु लागले आहे ते म्हणजे मतदाराच्या हातातील स्क्रीन, अर्थात मोबाईलचा. या मोबाईलवर टेलिव्हिजनसह युट्युब आणि सोशल मिडीयातील पोस्टसचा राबता सुरु झाला आहे. त्यासाठी असा व्हर्चुअल प्रचार करण्यासाठी विविध एजन्सीज सज्जही झाल्या आहेत.
वीस वर्षांपूर्वीचे निवडणुकीचे से वातावरण आठवा. लाऊडस्पीकर
लावून रस्त्यावर फिरणारी वाहने तुम्हाला आठवत असतीलच. आज वातावरण बदलले आहे. निवडणुकीचा रस्त्यावरचा दणदणाट कमी झाला आहे. निवडणुकीच्या ज्वरात बुडालेल्या कार्यकत्यांची संख्या कमी झाली आहे.
अशा परिस्थितीत आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया हे एक सशक्त माध्यम म्हणून उदयास आले आहे. आता प्रचार मैदानापेक्षा व्हच्र्युअल प्लॅटफॉर्मवर जास्त होत आहे.
उमेदवार फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
त्यामुळे फेसबुकसह विविध सोशल मिडीयामध्ये लिहिणा-या कंटेंट रायटर्स आणि प्रभावी अर्थात इन्फ्ल्युएन्सर लेखकांची चलती आहे. राज्यात अनेक छोट्या-मोठ्या सोशल मीडिया एजन्सीज कार्यरत आहेत.
शिवाय कंटेंट रायटर्सना मोठी मागणी आहे. सोशल मीडिया फ्रेंडली असलेले आणि तरुणांचे विचार समजून घेणारे कंटेंट रायटर राजकीय पक्षांची पहिली पसंती बनले आहेत. सध्या सोशल मीडियावर वन लाइनर्सचा ट्रेंड सुरू आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!