क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

अवैध्य दारुभट्टीवर कारवाई ; अवैध्य धंद्यांचा नायनाट करणार – पोलिस निरीक्षक संतोष डोके

दौंड (टीम – बातमीपत्र)

 

अवैद्य धंदयावर कारवाई चालू राहणार असून दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंदयांचा समूळ नायनाट करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की , दि. ५ एप्रिल रोजी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बोरीबेल (ता. दौंड) येथील खळदकर वस्ती कॅनॅलचे कडेला, काटवनात आरोपी मनोज उर्फ मन्या हिरामण चव्हाण (रा. बोरीबेल ता. दौंड जि. पुणे) हा अवैध्यरित्या गावठी हातभट्टीची दारू भट्टी लावून तिची आपल्या ओळखीच्या लोकाना विक्री करीत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्या नंतर या ठिकाणी पोलीस निरीक्षक संतोष डोके , पोलीस उपनिरीक्षक शाहाजी गोसावी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस हवालदार महेंद्र लोहार यांनी त्याठिकाणी जावून छापा घातला असता तेविस हाजर पाचशे पन्नास रूपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू तयार करणेसाठी लागणारे साहित्य, कच्चे रसायन व तयार गावठी हतभट्टीची दारू मिळून आले. सदरचे कच्चे रसायन, लोखंडी व प्लॅस्टिक बॅरेल व इतर साहित्य हे जागीच नष्ट करून टाकले व आरोपी मनोज उर्फ मन्या हिरामण चव्हाण याच्यावर

महाराष्ट्र दारू बंदी कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आला असून पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र लोहार हे करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमूख , अपर पोलीस अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव  यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाई नंतर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अवैद्य धंदयावर कारवाई चालू राहणार असून दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंदयांचा समूळ नायनाट करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!