सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांना देणं लागतात, प्रतिज्ञापत्रात सुळेंनी जाहीर करून टाकलं..
पुणे(टीम – बातमीपत्र)
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार व त्यांचा मुलगा पार्थ पवार यांना 55 लाख रुपये देणे लागत असल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शपथपत्र दाखल करायचे होते या शपथपत्रामध्ये मध्ये पान नंबर 19 मध्ये सुप्रिया सुळे ह्या पार्थ पवार यांना 20 लाख तर सुनेत्रा पवार यांना 35 लाख रुपये देणे आहेत असे नमूद केले आहे.
तसेच महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनीही आपल्या शपथपत्राच्या जोडपत्रात सुप्रिया सुळे यांच्याकडून येणे असल्याचे नमुद केले आहे.