बारामती लोकसभा मतदारसंघात दोन तुताऱ्या ………
दौंड (टीम – बातमीपत्र)
बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यानंतर
अपक्ष उमेदवार शेख सोयेलशहा यांना तुतारी हे निवडणूक चिन्ह निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे
दोन्ही चिन्हात भिन्नता असली तरी यामुळे मतदारांचा घोळ होऊ शकतो अशी चर्चा आता रंगू लागली आहे .
बारामती लोकसभेसाठी एकूण 38 उमेदवार रिंगणात असुन मुख्य लढत असणाऱ्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार ह्या घड्याळ चिन्ह सह मतदान मशीन वर दुसऱ्या क्रमांकावर असणार आहेत तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्ह सह तिसऱ्या क्रमांकावर असणार अपक्ष उमेदवार शेख सोयेलशहा हे तुतारी चिन्ह सह 32 व्या क्रमांकावर असणार आहेत .
मतदान मशीन शेजारी शेजारी असल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची मात्र मतदान करताना कसरत होऊ शकतो.