मनोरंजन

‘कलर्स मराठी’वर नव्या मालिकांचा धडाका; आणखी एका सीरियलचा प्रोमो लाँच

'अबीर गुलाल' या मालिकेची घोषणा केल्यानंतर आता आणखी एका मालिकेची घोषणा कलर्स मराठीने केली आहे.

टीआरपीच्या शर्यतीत मागे राहिलेल्या ‘कलर्स मराठी’ने (Colors Marathi) शर्यतीत पुन्हा येण्यासाठी नव्या मालिकांचा धडाका सुरू केला आहे. मागील काही दिवसांमध्ये ‘कलर्स मराठी’वर नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. तर, आता नव्या मालिका येणार आहेत. ‘अबीर गुलाल’ या मालिकेची घोषणा केल्यानंतर आता आणखी एका मालिकेची घोषणा कलर्स मराठीने केली आहे.

मागील आठवड्यात कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुख कळले’ ही मालिका सुरू झाली. सागर देशमुख आणि स्पृहा जोशीची यात प्रमुख भूमिका आहे. तर, काही दिवसांपूर्वी अबीर गुलाल या मालिकेची घोषणा झाली होती. आता कलर्स मराठीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. रशमी अनपट या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. “नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने धरला दुराव्याचा अंतरपाट,” अशा कॅप्शनसह ‘अंतरपाट’ या नव्या मालिकेची घोषणा प्रोमोसह घोषणा करण्यात आली.

प्रोमोमध्ये काय ?

प्रोमो मध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याचे दाखवले आहे. घरात लग्नकार्य असल्याने आनंदाचे वातावरण आहे. वधू देखील  आनंदी असून लव्ह मॅरेजच्या काळात अ‍ॅरेंज मॅरेज करतेय, मला जोडीदार परफेक्ट मिळाला आहे. किती वर्ष लग्नाची स्वप्ने पाहिले असल्याचे नायिका सांगते. तर, दुसरीकडे मालिकेचा नायक हा उदास चेहऱ्याने आपल्या बेडवर पडलेला असतो.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!