Gamesमनोरंजन

“जर मी RCB विरूद्ध खेळलो असतो…” ऋषभ पंतचे सामन्यानंतर मोठे वक्तव्य, BCCIलाही ऐकवलं

दिल्लीने जबरदस्त कामगिरी करत लखनऊवर १९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात बंदी घातलेल्या ऋषभ पंतने संघात पुनरागमन केले होते. याबद्दल बोलताना पंत काय म्हणाला, जाणून घ्या

ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२४च्या साखळी टप्प्यातील सर्व १४ सामने खेळले आहेत. साखळी टप्प्यातील अखेरच्या सामन्यात दिल्लीने अष्टपैलू खेळी करत लखनऊचा १९ धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्ली १४ गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे, पण प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. दिल्लीने आऱसीबीविरूद्धचा सामना जिंकला असता तर ते प्लेऑफच्या शर्यतीत नक्कीच एक पाऊल पुढे असते, यावर ऋषभ पंतने साम्यानंतर वक्तव्य केले.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत असे मानतो की कदाचित त्याच्या एका सामन्याच्या बंदीमुळे दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळाले नाही, कारण तो मैदानात असता तर त्यांना रॉयलविरुद्धचा सामना जिंकण्याची मोठी संधी मिळाली असती. या आयपीएल हंगामात तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दिल्लीचा संघ दोषी आढळल्याने पंतला १२ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धचा सामना खेळण्यावर बंदी घातली होती.

दिल्ली कॅपिटल्सने केवळ आरसीबीविरुद्धचा सामना गमावला नाही, तर ४७ धावांच्या पराभवामुळे त्यांच्या नेट रन रेटवरही परिणाम झाला. आता प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी दिल्लीला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. दिल्ली संघ आता १४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांना सनरायझर्स हैदराबाद (SRH), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनऊ संघाच्या पराभवासाठी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यातील पराभवाची प्रार्थना करावी लागेल. दिल्लीच्या विजयासह राजस्थान रॉयल्स प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला.

सध्या दिल्ली कॅपिटल्सने १९ धावांनी विजय मिळविल्यानंतर पंत म्हणाला, “मी असे म्हणणार नाही की जर मी खेळलो असतो, तर आम्ही नक्कीच सामना जिंकला असता, पण जर मला गेल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली असती तर संघाला प्लेऑफसाठी पात्र होण्याची अधिक चांगली संधी होती.”

पंत म्हणाला, “आम्ही मोसमाची सुरुवात खूप आशेने केली, पण आम्हाला दुखापती आणि अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला, पण फ्रँचायझी म्हणून तुम्ही नेहमीच तक्रार करू शकत नाही, तुमच्याकडे जे आहे त्यासह तुम्हाला कामगिरी करत राहावी लागेल. काही गोष्टी अशा आहेत ज्यावर तुमचे नियंत्रण असते, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही नियंत्रित करू शकत नाही.”

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!