दौंडचे आरोग्यदूत आमदार राहुल कुल धावले अपघातग्रस्तच्या मदतीला
यवत (टीम बातमीपत्र) पुणे – सोलापूर महामार्ग हा नेहमीच वाहनांची वर्दळ असणारा महामार्ग आहे या महामार्गावर भांडगाव गावाच्या हद्दीत सोनाक्षी मंगल कार्यालय जवळ गुरुवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास सोलापूर वरून पुण्याच्या बाजूला जाणाऱ्या लेन वर दुचाकी ला दुचाकी ने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला होता.
या अपघातात दोन लहान मुले जखमी झाले आहेत तर यात एका लहान मुलांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. यावेळी आमदार राहुल कुल हे दौंडवरून कामकाज उरकून पुण्याच्या दिशेने जात असताना महामार्गावर अचानक गर्दी दिसली म्हणून आमदार कुल यांनी गाडी थांबवली असता त्यांना दोन लहान मुले अपघातग्रस्त झाल्याची दिसली यावेळी त्यांनी तत्काळ यवत येथील श्री दत्त ट्रान्सपोर्ट चे संदीप दोरगे यांना फोन करून रुग्णवाहिका पाठव असे सांगितले यावेळी अवघ्या काही मिनिटात त्या ठिकाणी रुग्णवाहिका आल्यामुळे अपघात मधील दोन्ही जखमी अल्पवयीन मुलांना प्राथमिक उपचारसाठी सुरवातीला यवत मध्ये व पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दोन्ही रुग्णालयात संबधित अधिकाऱ्यांना आमदार कुल यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून तातडीने उपचार करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत,
आमदार कुल यांनी समाजमाध्यमावर केलेली पोस्ट पुढील वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – https://www.facebook.com/RahulSKool/posts/pfbid0dqHxYtrMwYv1gFyq9EyT1pHHVo6WMPFnrokDBqN1kLbstLKf8YdgNokfg8GepvYHl