राजकीयराष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे पर्व होणार ९ जूनला सुरु, तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

टीम बातमीपत्र – देशाचं लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. ०४ जून हा दिवस देशातील सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस ठरला. या दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. एनडीए च्या २९२ जागा आल्या असून इंडिया आघाडीच्या २३४ जागा निवडून आल्या. मात्र, सध्या चर्चा आहे ती यंदा पंतप्रधानपदाची शपथ कोण घेणार याची. दरम्यान, ९ जूनला नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.

नरेंद्र मोदी हे ९ जून रोजी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणार आहेत. ९ तारखेला सायंकाळी ६ वाजता मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. भाजपचे जेष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. शपथविधी सोहळ्यापूर्वी एनडीए आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची जुन्या संसदेत बैठक पार पडली. यावेळी एनडीए आघाडीचे खासदार, मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली.

दरम्यान, पंडित जवाहरलाल नेहरु हे सलग तीनवेळा निवडून येणारे एकमेव पंतप्रधान होते. नेहरुंची देखील तिन वेळा पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र आता निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी सलग तीनवेळा निवडून येणारे पंतप्रधान होणारे देशाचे दुसरे पंतप्रधान ठरतील.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!