मोकाट कुत्र्यांचा उच्छाद , अनेकांना चावा…….
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड शहरात मोकाट कुत्र्यांनी मोठा उच्छाद घातला आहे .शहरात दि. २० व दि. २१ रोजी साधारण ३० ते ३५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याचे समोर आले आहे.
दौंड नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री राजरोसपणे फिरत असतात यापूर्वी देखील अनेकांना ही मोकाट कुत्री चावली आहेत परंतु सुस्त पडलेली नगरपालिका याकडे लक्ष देत नाही. याबाबत अनेकदा बातम्या छापून देखील सुस्त पडलेल्या प्रशासनाला जाग आली नाही . दोन वर्षांपूर्वी कुत्रा चावल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावरून देखील नगरपालिकेने कोणताही बोध घेतला नाही. नगरपालिका केवळ कुत्रे पकडण्याचे टेंडर काढते व उगीच थातूरमातूर कारवाई केल्याचे दाखवतात व भरमसाठ बिल निघते .
याबाबत दौंड नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी शाहू पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की , दोन दिवसांपासुन अनेकांना मोकाट कुत्री चावली आहेत. पिसाळलेला कुत्र्याचा शोध सुरू केला आहे सोमवारपासून शहरातील मोकाट कुत्री पकडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.