दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड.प्रशांत गिरमकर ……….
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड.प्रशांत बाप्पूसाहेब गिरमकर हे निवडून आले आहेत.
दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक बुधवारी दि. ३१ जुलै रोजी पार पडली.
या निवडणूकीसाठी संघटनेचे २५७ सदस्य असून २३७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मावळते अध्यक्ष ॲड. कैलास गायकवाड यांनी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव ॲड.दत्तात्रय पाचपुते यांनी कामकाज पाहिले.
यामध्ये अध्यक्षपदासाठी ॲड.प्रशांत गिरमकर , उपाध्यक्षपदी ॲड.संदीप येडे ,सचिवपदी ॲड.अजित दोरगे
सहसचिवपदी ॲड.ऋषिकेश काकडे
सदस्यपदी ॲड.ओंकार नागनाथ चौधरी, ॲड.अश्लेषा नंदकुमार शेलार, ॲड.निखिल बबन शिंदे आणि ॲड.तुकाराम जालिंदर शेळके हे विजयी झाले आहेत. तर
खजिनदारपदी ॲड.दिप्ती राजु जगदाळे , हिशोबणीसपदी ॲड.ऊमा गणेश कुलंगे , ग्रंथपालपदी ॲड.मयूरी मनोज ऊंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.