मुस्लिम धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल करा, मुस्लिम समाजाची मागणी……
दौंड(टीम – बातमीपत्र)
मुस्लिम धर्माबद्दल तसेच मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करून देशाची कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या, श्रीरामपूर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणी करिता दौंड शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने दौंड पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
आज दि. 19 ऑगस्ट रोजी
मुस्लिम धर्माबद्दल व मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करून देशाची कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या, श्रीरामपूर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा तसेच देशातील कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या या कृत्याचा दौंड मधील काही धर्मांध लोक समर्थन करीत असल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट वरून दिसत असुन शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा धर्मांध लोकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवून, त्यांच्याकडून जर असे कृत्य होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू बांधवांवर होणाऱ्या अन्याय ,अत्याचार व हल्ल्यांचाही यावेळी निषेध करण्यात आला व त्याचे निवेदन हि पोलिसांना देण्यात आले आहे.
यावेळी मौलाना असलम रझा , मौलाना हरून हाफीज , बादशहा शेख सोहेल खान ,मतीन शेख , युसुफ इनामदार ,रतन जाधव ,नागसेन धेंडे, भारत सरोदे, अमित सोनवणे ,सागर उबाळे , सचिन खरात , तजमूल काझी आदी उपस्थित होते.