गोमांस वाहुतक करणारा कंटेनर ट्रक पकडला, गुन्हा दाखल……..
दौंड (टीम- बातमीपत्र )
हैदराबाद येथून मुंबईकडे गोमांस वाहतूक करणारा कंटेनर पकडला असल्याची माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , दि. 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन (रा. महादेव नगर , उरुळी कांचन , ता. हवेली जि. पुणे) यांना मिळालेल्या माहितीनुसार खडकी (ता. दौंड) येथील हॉटेल आकांक्षा समोर असणाऱ्या मोकळ्या जागेत हैदराबाद येथून गोमांसाने भरलेला कंटेनर ट्रक उभा आहे अशी माहिती मिळाल्याने दौंड पोलिसांनी कंटेनर ट्रक क्रमांक (एमएच 46 एआर 0516) याची माहिती घेत तपासणी केली असता या कंटेनर ट्रकमध्ये 25 हजार किलो वजनाचे गोमांस व चार हजार किलो वजनाचे म्हशीचे मांस याची किंमत रक्कम रुपये 59 लाख वीस हजार रुपयाचे गोमांस व म्हशीचे मांस मिळून आल्याने कंटेनर चालक चंद्रकांत दत्तू साळुंखे (रा.खांदाकॉलनी ता.पनवेल जि. रायगड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दौंड पोलीस पुढील तपास करत आहे .
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके , सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड , सहाय्यक फौजदार कुंभार , पोलीस हवालदार बंडगर , पांढरे , राऊत , पोलीस कॉन्स्टेबल कोठावळे यांनी केलेली आहे.